पुणे महानगर पालिकेचे ऑनलाईन टॅक्स भरताना १.४० लाखांची फसवणूक.

0
Spread the love

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

गुगल सर्च इंजिनवरील फोन नंबर, ई-मेल,व इतर बाबी तपासताना सावधान, तुमचीही होऊ शकते फसवणूक. अशीच एक फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे.

पुणे महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन प्रॉपर्टी टॅक्सचे पैसे भरल्यानंतर अर्धेच पैसे भरले गेल्यानं गुगलवर पुणे महानगर पालिकेचे ऑनलाईन व्यवहार तपासताना फसवणूक झाल्याप्रकरणी महादेव उर्फ माधव खरात, वय ४४ वर्ष रा. मोहमंदवाडी यांनी फिर्याद दिली आहे.

ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी व फिर्यादी यांची मुलगी यांनी मोबाईलवरुन पत्र्याचे शेडचा कर पुणे महानगरपालीकेच्या संकेतस्थळ वेबसाईटवर जावुन १लाख रुपये भरणा केला.

त्यानंतर राहिलेला कर भरणा होत नसल्यामुळे गुगल इंजिनवर सर्च केलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर माहिती विचारली असता त्याने Anydesk remote desktop अॅप डाऊनलोड करायला सांगुन फिर्यादी यांचे खात्यातुन १ लाख ४१ हजार रुपये रक्कम घेवुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here