पुणे सिटी टाईम्स: प्रतिनिधी, मोबाईल चे आज दुष्परिणाम दिसून येत आहे. तर आता सध्या ऑनलाईनमुळे सगळं जग जवळ आले आहे त्यात कोरोना मुळे ऑनलाईन शाळा असल्याने पालक लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होतात,
परंतु त्या मोबाईल मध्ये मुले मुली काय पाहतात हे पालकांच्या दुर्लक्षामुळे भलतेच प्रकरण समोर येत आहेत. अश्लील व्हिडीओ बघून १४ वर्षीय सख्या भावाने आपल्या अल्पवयीन ३ वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सदरील घटना भोसरी परिसरात घडली आहे.हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही पीडित मुलीच्या आईवडिलांनाही धक्का बसला.
या घटनेविषयी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
भास्कर जाधव यांनी माहिती दिली.
पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त भावाने ३ वर्षाच्या सख्ख्या चिमुकल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे.अभ्यास करत असताना युट्युबवरील अश्लील व्हिडिओ पाहूनच हे अश्लील कृत्य केल्याची कबुली त्याने आपल्या आई-वडिलांना दिली.
हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला असून, आता तो समोर आला आहे.आईवडिल कामावर गेल्यानंतर काय घडलं?ऑगस्ट महिन्यात भाऊ बहीण विधीसंघर्षग्रस्त मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी घरी होते.
आईवडिल कामावर गेल्यानंतर भावाने वडिलांच्या मोबाईलमध्ये युट्यूबवर अश्लील चित्रफित पाहिली.त्यानंतर घरात एकट्याच असलेल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला.
या प्रकारानंतर चिमुकलीला वेदना होऊ लागल्या. त्यामुळे आई-वडिलांनी तिला उपचाराकरिता पिंपरीतील एका रुग्णालयात दाखल केलं.डॉक्टरांनी तपासणी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती दिली.
त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन तिच्या आई-वडिलांनी या अत्याचाराबाबत विचारलं. त्यावर मोठ्या दादानेच हे कृत्य केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितलं.
या प्रकारानंतर पिंपरीतील सरकारी रुग्णालयाच्या मार्फत भोसरी पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली आहे.विधीसंघर्षग्रस्त मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.