कोंढव्यात नागरिकांचा संताप, ठेकेदार- जबाबदार अधिका-यांवर कारवाईची मागणी.
शहजाद अमीर सय्यद या चिमुकल्याचा मृत्यू.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधींने, अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे एक पाच वर्षाच्या चिमुकल्याला आपले जिव गमवावे लागले आहेत. कोंढव्यातील नवाजिश पार्कगल्ली नंबर १० कुबा मस्जिद येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे, गेल्या २० दिवसांपासून संथ गतीने काम चालू आहे.
काम करत असताना ठेकेदाराने व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या सुरक्षेबद्दल हलगर्जीपणा करुन रस्ते खोदण्याचे काम चालू केले आहे.
काम करत असताना संबंधितांनी कोणती दक्षता न घेतल्याने ५ वर्षाच्या शहजाद अमीर सय्यद या बालकाला आपला जीव गमवावा लागला.
ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी जेसिबीद्वारे रस्ते खोदाइचे काम चालू होते. या खोदाइमुळे नागरिकांना येणे जाणे अत्यंत कठीन झाले आहे.
रस्ते खोदताना त्या जेसिबीचा फटका विद्युत वाहीनीच्या डीपीला बसला व त्यातील एक वायर कट झाली त्याकडे त्या जेसीबी वाल्याने व ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यानेच शहजादचा मृत्यू झाला.
या चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? ज्या अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे त्या बालकाचे मृत्यू झाले त्यांच्यावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.