बांधकाम विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली फिर्याद
FIR ची प्रत देण्यास बांधकाम विभागाची टोलवाटोलवी?
जे देईल त्याचा भला,जे देणार नाही त्यांच्यावर FIR दाखल करतो भला? सावरकर भवनतात चर्चाच चर्चा?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
कोंढवा खुर्द परिसरात बघता बघता मोठ्या संख्येने बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. पुणे महानगर पालिका काही ठिकाणी कारवाई करत आहेत.तर काही ठिकाणी गुन्हे दाखल करत आहे.असेच गुन्हे काहि दिवसांपूर्वीच कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
सर्वे नंबर ४६ चेतना गार्डन येथे इमारत अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी शोएब शेख व विनायक गायकवाड,बिलाल पटेल यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तर सर्वे नंबर ४८ येथील नुराणी कब्रस्तान समोर अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी नदिम नूर खान, समर सय्यद,आसिफ कदीर शेख यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम ५३(१) व कलम ५२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरील फिर्याद पुणे महानगर पालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक २ मधील कनिष्ठ अभियंता खोले व छापेकर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात दिली आहे. बेकायदेशीर बांधकामे करणा-या विरोधात तर आणखीन गुन्हे दाखल करण्याचे काम चालू असल्याचे अधिकृत सुत्रांनी माहिती दिली आहे.
एमआरटीपी MRTP अॅक्टनुसार गुन्हे दाखल होतायेत परंतु तडीपार,मोकका सारखे गुन्हे कधी दाखल होणार?
कोंढव्यातील बेकायदेशीरपणे बांधकाम करणाऱ्या विरोधात पुणे महानगर पालिकेकडून गुन्हे दाखल करण्याचे काम चालू असून एका-एका बिल्डरवर पाच पाच सहा सहा गुन्हे दाखल करण्यात आले असतानाही त्यांनी काद्याची भिती राहिलेली नाही, तीन गुन्हे दाखल असेल तर पुणे पोलिस तडीपार,मोक्काचे गुन्हे दाखल करतात परंतु बेकायदेशीरपणे बांधकाम करणाऱ्या विरोधात तीन चार एफआयआर FIR दाखल असतानाही त्यांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई का नाही? असा प्रश्न देखील सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. क्रमशः (बांधकाम विकास विभागातील अधिकारी तुपात तर बाकीचे कोमात पुढील भागात)