पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
तडीपार गुन्हेगाराची खडक पोलिसांना धक्काबुक्की केल्याने दोन जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
खडक पोलिस ठाणे ३८९/२०२३ भादविक ३५३,३३२, ५०६, ५०४, ३४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील फिर्याद सागर कुडले, पोलीस अंमलदार खडक पोलीस ठाणे यांनी दिली आहे.
९ नोव्हेंबर २०२३ रोजी मेरे मेहबुब पान शॉप समोर घर नं ४०७, ५४ बी.पी. लोहीयानगर, येथे यातील फिर्यादी हे पोलीस ठाण्याचे हददीत गस्त करीत असताना, तडीपार असलेला गुन्हेगार जुबेर उर्फ वडी मुस्ताक शेख, वय २० वर्षे, रा. ५४ बी. पी. लोहीयानगर, पुणे हा फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना दिसल्याने त्यास पकडणे कामी जात असताना, यातील नमुद इसमाने फिर्यादी यांचे बोट पिरगळुन हाताला हिसका देवुन पळुन गेलेने,
त्यास पकडणेकामी फिर्यादी हे पुढे जात असताना,सदर महिलेने फिर्यादी बरोबर वाद घालुन,दरवाजा बंद करुन, तडीपार इसमास छतावरुन पळवुन लावुन, फिर्यादीस अपशब्द वापरून ते करीत असलेल्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला.पुढीव तपास सहा पोलिस निरीक्षक हनुमंत काळे करीत आहेत.