परवानगी नसतानाही पुणे महानगर पालिकेसमोर सभा घेतल्याप्रकरणी हिंदू महासभा आघाडीचा अध्यक्ष मिलींद एकबोटे, पुण्येश्वर पुननिर्माण समितीचा कुणाल कांबळे याच्यावर गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

परवानगी न घेता पुणे महापालिकेच्या गेटसमोर आंदोलन करणाऱ्या समस्त हिंदु आघाडीचा अध्यक्ष मिलींद एकबोटे याच्यासह ४ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ या दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या मुख्य बिल्डींग प्रवेशद्वारा जवळ घडला होता.


समस्त हिंदू आघाडीचा अध्यक्ष मिलींद एकबोटे, पुण्येश्वर पुननिर्माण समितचा कुणाल सोमेश्वर कांबळे, किरण चंद्रकांत शिंदे, विशाल दिलीप पवार यांच्यासह इतरांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी १४१,१४२, १४३,१५३, १०९, १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ज्ञानेश विष्णु माने यांनी रविवारी २४ सप्टेंबर फिर्याद दिली आहे. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केले. आंदोलनामध्ये कार्यकर्ते जमवून चिथावणी देणारी भाषणे करुन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारी भाषणे केली. तसेच आदेशाचा भंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. विधी अधिकारी (वर्ग-१) पोलीस आयुक्त कार्यालय पुणे यांनी अभिप्राय मिळवुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here