पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
शाहरुख खानचे पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादंग सुरू आहे. तर काही हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. याच प्रकरणी पुण्यात पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडून घोषणाबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चित्रपटगृहाच्या आवारात शिरुन ‘पठाण’ चित्रपटाची बॅनर फाडून घोषणाबाजी करणाऱ्या बजरंग दलाच्या १९ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस शिपाई अंकुश कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार राहुल चित्रपटगृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.
पठाण चित्रपटातील एका गाण्यात दीपिका पादुकोन हिने भगवी वस्त्रे
घालून अश्लिल नृत्य केले आहे.
पठाण चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर राहुल चित्रपटगृहात लावण्यात आले होते.हे समजल्यावर बजरंग दलाचे काही कार्यकर्ते तेथे जमले व त्यांनी पोस्टर फाडून शाहरुख खान विरोधात घोषणाबाजी केली.त्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.