कोंढव्यातील पुणे महानगर पालिकेच्या बहुउद्देशीय हॉलवर कब्जा करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल; पुणे सिटी टाईम्स इंपॅक्ट

0
Spread the love

समाजिक कार्यकर्ते हाजी फिरोज शेख व माजी नगरसेवक रईस सुंडके यांनी उचलला होता आवाज.

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

कोंढव्यातील सर्वे नंबर ४८ येथील पुणे महानगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या हजरत आझम अबु हनिफा बहुउद्देशीय हॉलवर अनधिकृतपणे ताबा घेऊन ते भाडयाने दिला जात असल्याची बातमी ६ मार्च रोजी प्रथम पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत पुणे महानगर पालिकेची झोपी गेलेली यंत्रणा खळबळून जागे होत कामाला लागली, काही तासातच पुणे महानगर पालिकेच्या समाज विकास विभागाने सिल मारून सदरील हॉल ताब्यात घेतले आहे.

तर पुणे महानगरपालिकेने बांधलेला बहुउद्देशीय हॉल परस्पर ताब्यात घेऊन तो भाड्याने देऊन पैसे कमविणा-या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून कोंढवा पोलिसांकडून तोतया मालकाचा शोध घेतला जात आहे.याबाबत मनपाचे समाज विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता विवेकानंद विष्णु बडे वय-४४ रा. समर्थ नगर, नवी सांगवी यांनी सोमवारी ६ मार्च रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मागील बातमी वाचण्यासाठी }}} कोंढव्यात पुणे महानगर पालिके च्या मालमत्तेवर अनधिकृतपणे कब्जा; लाखो रुपये बेकायदेशीर लाटल्याचा आरोप

पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध आयपीसी ४४८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईबाबा नगर कोंढवा येथे पाच हजार चौरस फुटाचा इमाम आझम अबु हनिफा बहुउद्देशीय हॉल आहे. या हॉलचे बांधकाम मार्च २०२२ ला पूर्ण झाले.तेव्हाच महापालिकेच्या भवन रचना विभागाने तो मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित केला आहे. तेव्हापासून हॉल कुलूप लावून बंद आहे.अज्ञातांनी हॉलचे कुलूप तोडून ताबा घेऊन अतिक्रमण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here