प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या नूपुर शर्मा विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

लवकरात लवकर अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी, भाजपाच्या नूपुर शर्माने (Nupur Sharma) काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल उलटसुलट वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजामध्ये सध्या रोष असून नुपूर शर्मा विरोधात मोर्चे, आंदोलने चालू आहे.

तर पुण्यातील पिंपरी पोलिस ठाण्यात (Pimpri police station) नुपूर शर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील तक्रार इम्रान युसुफ शेख ( Imran Yusuf Shaikh ) यांनी केली आहे.

नुपूर शर्माने एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती मध्ये बोलता बोलता त्याची जिभ घसरली, तिने प्रेषितांबद्दल चुकिचे वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजामधून आक्रोश सुरू आहे.

नुपूर शर्मा विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम १५५अ,१५५ब, २९५अ,५०५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पिंपरी पोलिसांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here