पुणे शहरातील क्राईम ब्रांच शाखेतील २ पोलिसांसह २ अनोळखी व्यक्तींवर फसवणूकीचा, बलात्काराचा, मारहाणीचा गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील क्राईम ब्रांच मधील २ पोलिसांसह २ अनोळखी व्यक्तींवर आणि एका महिलेसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी एका २४ वर्षीय पिडीतेने तक्रार दिली आहे. पोलिस अंमलदार कादीर कलंदर शेख आणि पोलिस अंमलदार समीर पटेल,२ अनोळखी व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरूध्द भादंवि कलम ४२०,३७६, ३९२, ३२३,५०४,५०६,३४ तसेच अनुसूचित जाती / जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम सन १९८९ चे कलम 3 ( १ ) ( १२ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बी.टी. कवडे रोडवरील श्रीनाथ कॉम्प्लेक्स आणि आंबेडकर चौकातील डायमंड क्वीन हॉटेल समोर घडली आहे.सुमारे ३ वर्षापुर्वीपासुन ते १ जुलै २०२३ दरम्यान हा गुन्हा घडला आहे. सदरील गुन्हा लष्कर पोलिस ठाणे येथुन सीसीटीएनएस प्रणातीत प्राप्त झाल्याने मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,पिडीत महिला या अनुसूचित जातीतील आहेत. त्याबाबत आरोपी कादीर शेखला माहित असताना देखील त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले.वेळावेळी आळंदी येथे जावून लग्न करण्याचे बहाणे केले.प्रत्येक वेळी काही ना काही कारण देवून लग्न करण्यास टाळाटाळ केली. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर कादीर शेखने पिडीत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली.

१ जून २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान आंबेडकर चौकातील हॉटेल डायमंड क्वीन येथे आरोपी कादीर शेख,समीर पटेल आणि इतरांनी पिडीत महिलेला मारहाण केली. कादीर शेखने त्यांचा मोबाईल हिसकावून नेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत. तर कदीर व समीर ला गोवण्यात आल्याची चर्चा सध्या पोलिस दलात सुरू असून याबाबत निष्पक्ष चौकशी करण्याची चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here