पुणे महानगर पालिकेने ठरवून दिलेले वेळ बदलल्याने गिरणी मालकाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0
Spread the love

वडगाव शेरी येथील प्रकार. चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

वडगाव शेरी भागातील एका पिठाच्या गिरणीमालकाने पुणे महानगर पालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत बदल करून बोर्डवर खाडाखोड करत २ तासांची वेळ वाढविल्याने मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर मुक्ताजी शिंदे ७२ रा. वडगाव शेरी, असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पुणे मनपाच्या वतीने चंदननगर पोलिस ठाण्यात व्यंकटेश मारुती पवार वय २९, रा. वाघोली यांनी तक्रार दाखल केली आहे.

हा प्रकार २८ जानेवारी २०२२ ते १८जुलै २०२२ दरम्यान घडला. शंकर शिंदे यांची वडगाव शेरी परिसरात दत्तप्रसाद हौसिंग सोसायटी येथे श्री गणेश फ्लोअर मिल आहे.

ही फ्लोअर मिल चालविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने परवाना देण्यात आला आहे. पालिकेने दिलेल्या परवान्यात गिरणी चालविण्याची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी नमूद करण्यात आली होती.

तर शिंदे यांनी या परवान्यात गिरणीची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ९ पर्यंत असा खोटा मजकूर तयार करून परवान्यातील वेळेत फेरफार करीत महानगरपालिकेची फसवणूक केल्याने शंकर शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here