कोंढव्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टची फसवणूक केल्याप्रकरणी ८ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यात जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशिद खान (वय ४४, रा. नाना पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५२८/२३) दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी तबस्सुम अन्वर शेख (वय ४८), अन्वर नजीमुल्ला शेख (वय ५५, दोघे रा.कॅम्प), तरन्नुम कादर सय्यद (वय ४३), कादर छोटेमिया सय्यद (वय ५२, रा. लोणावळा),नाजेमा साहेल खान (वय४२), सोहेल इस्माईल खान (वय ४८, रा. अम्मार सोसायटी, कोंढवा) आरीक शेख (वय ३७),आरीफ शेख (वय ४०) यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.ट्रस्ट व त्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे कागदपत्रावर आरोपींनी खोट्या सह्या केल्या. विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यावर जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करुन शासनाची व संस्थेची फसवणूक केली.

आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीचे आईच्या नावाने बनावट व खोटी सही करुन संस्थेचे लेटरहेड वापरुन जव्वाद शेख या शिक्षकाची अनुदानित पदावर नेमणूक केली आहे.नाजेमा साहेल खान या सतत आजारी असून गैरहजर असताना ही शाळेच्या मस्टरवर एकत्रित सही करुन शासनाची फसवणूक केली असल्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल आहे केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here