फुरसुंगी येथील खुले निवारागृहातून ५ मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

फुरसुंगी येथील खुले निवारागृहातून ५ मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणात एक महिला अधिकारी, वय – ३७ वर्ष, अधिक्षक / कौन्सलर, मातोश्री रेवमा मुलीचे खुल निवारागृह,गंगानगर फुंरसुगी,यांनी फिर्याद दिली आहे.

अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मातोश्री रेवमा मुलीचे खुले निवारागृह फुंरसुगी, ता. हवेली, जि. पुणे येथे फिर्यादी हया मातोश्री रेवमा मुलीचे खुले निवारागृहात अधिक्षक कौन्सल म्हणुन काम पाहतात.

सदर ठिकाणी असलेल्या मातोश्री निवारागृह येथुन पाच अल्पवयीन मुलींना,कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, कशाचेतरी आमिष दाखवुन, फिर्यादी यांचे कायदेशीर रखवालीतुन फुस लावुन पळवुन नेले आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशिल डमरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here