जुबेर रशिद खान यांनी काही दिवसांपूर्वीच लाखो रूपयांची फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
कोंढव्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची एफआयआर जुबेर रशिद खान यांनी केल्यानंतर काहीच दिवसांनी जुबेर खान यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हकीकत अशी की, शाळेच्या मालमत्तेवरुन जुबेर रशिद खान व त्यांच्या बहिणींचा वाद सुरू असून त्यात जुबेर ने शिक्षिकेला शाळेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गु . रजि . नं . ७१०/२३ गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी जुबेर रशिद खान वय ४५ , रा . पदमजी पार्क , नाना पेठ,अजहर खान,वय ३८ आणि अफाक अन्सार खान, वय ४० यांच्यावर गुन्हा दखल केला आहे . हा प्रकार कोंढव्यातील मिठानगर येथील प्राथमिक शाळेत ५ जुलै २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता घडल्याचे सांगितले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी या कोंढव्यातील मिठानगर येथील एका प्राथमिक शाळेत टिचर म्हणून काम करतात.
शाळेच्या प्रिन्सिपल आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात शाळेच्या मालमत्तेवरुन वाद चालू आहेत.फिर्यादी या नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जात असताना गेटवरच जुबेर याने फिर्यादी यांचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले .शाळेत न जाण्याची धमकी दिली . तसेच इतरांनी फिर्यादीस शाळेत जायचे नाही तर आम्ही तुला मारणार अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.