पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यात मंगळवार पेठे येथे जुन्या बाजारात पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. तब्बल दहा दुकानांना ही आग लागली असून आगीने भीषण रूप धारण केले होते. जुन्या बाजारातील काही दुकांनांना मोठी आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांची धावपळ उडाली. आग नेमकी कशी लागली समजू शकले नाही. पण येथील १० दुकाने आगीच्या विळख्यात
सापडली आहेत.
जुना बाजार येथे आगीचे रूद्र रूप व्हिडिओ >>>
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे ८ बंब आणि कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर ८.३० च्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात आले आहे.आज सकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास एका दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला.
काही कळायच्या आत आगीने उग्र रूप धारण केले.धुराचे लोट दूर पर्यन्त दिसत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी देखील प्रयत्न सुरू केले.