पुणे रेल्वे स्टेशन जवळील बस स्टॉपवर चालतोय जुगार अड्डा; सासु कारवाई करणार का?

0
Spread the love

राजरोसपणे सुरू असलेला जुगार अड्ड्याला अभय कोणाचा?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले पुणे रेल्वे स्टेशन जवळ मटका, जुगार अड्डे फोफावले असून राजकीय व पोलिसांच्या आशिर्वादाने धंदे सुरू असल्याचे बोलले जात आहे. भररस्त्यात मटका सुरू असताना व हाकेच्या अंतरावर बंडगार्डन पोलिस ठाणे असताना, असे धंदे फोफावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ससून हॉस्पिटल शेजारी असलेल्या बस स्टॉपच्या मागे व पुणे रेल्वे स्टेशन एसटी स्टँड जवळच भलीमोठी गर्दी करून दिवसाढवळ्या भररस्त्यात मटका जुगाराचा खेळ रंगत आहे. बस स्टॉपवर महिला, मुली बसले असताना देखील कुणाला काही एक देणेघेणे नसून मटक्याचा धंदा राजरोसपणे सुरू आहे.

मटक्याच्या धंद्यावर येणारे गर्दुल्ले, पेताळ यांची संख्या काही कमी नाही. परंतु तेथे छेडछाडीचे प्रकार होत असल्याचे तेथे व्यवसाय करणाऱ्यांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. आत्ताच हे धंदे बंद पाडण्यात आले नाही तर पुढे एखाद्या वेळी अनर्थ झाल्यास बंडगार्डन पोलिस ठाणे याची जबाबदारी घेणार का?

मुली,महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अश्या मटका बहाद्दरांना अभय का दिला जात आहे? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. तर सगळीकडे कारवाई करणाऱ्या सासुला ( समाजिक सुरक्षा विभाग) हे जुगाराचे धंदे दिसत नाही का? आतातरी सासु कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here