पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
विमानतळ पोलीस ठाण्याच्या दिनांक ६ जूलै २०२३ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी विजय चंदन ,सपोनि,पोऊनि रविंद्र ढावरे असे तपास पथकातील स्टाफसह पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना, अंकुश जोगदंडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की,फॉरेस्ट पार्क मधुन लोहगाव कडे जाणाऱ्या रोडवर चार ते पाच इसम झाडीत बसले आहेत , त्यांचेकडे हत्यारे असुन त्यांच्यामध्ये आपआपसांत चर्चा चाललेली असुन ते एखादा मोठा गुन्हा करण्याची शक्यता आहे .
सदर बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांना कळविले असता , त्यांनी नमुद ठिकाणी जावुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्या ठिकाणी जावुन सापळा लावुन शिताफिने पाच इसमांना रात्री ११ वाजता ताब्यात घेण्यात आले आहे. सदर इसमांची नावे १ ) उमेश राम गायकवाड वय ३० वर्षे रा . साडेसतरा नळी साई मंदीराजवळ हडपसर.२ ) सुर्यकांत धोंडिबा रासगे वय ४२ वर्षे रा . राजीवगांधी नगर रासगे आळी मुंढवा.३ ) संतोष हरिदास गायकवाड वय ३७ वर्षे रा . रेणुका माता मंदीराजवळ गायरान वस्ती केशवनगर मुंढवा.४ ) नितीन शंकर जाधव वय २ ९ वर्षे रा . सर्वोदय कॉलनी मुंढवा.५ ) शेखर सिताराम गायकवाड वय ५८ वर्षे रा . सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे अशी आहेत.
त्यांचेजवळ एक मोठा स्क्रु ड्रायव्हर , कटावणी , हेक्साब्लेड फ्रेमसह , दोरी व मिरची पुड असे दरोड्याचे साहीत्य मिळुन आले.त्यांचेकडे विश्वासात घेवुन तपास करता त्यांनी आम्ही लोहगाव वाघोली रोड येथील इंडीयन ऑईल पेट्रोलपंपावर दरोडा टाकणार असलेबाबत निष्पन्न झाले . नमुद आरोपींचे विरुध्द विमानतळ पोलीस ठाणे येथे भादंविक ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन गुन्ह्याचा पुढील तपास विजय चंदन विमानतळ पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार ,पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, रंजन कुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी , सपोनि विजय चंदन , पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे , अंकुश जोगदंडे , सचिन कदम , रुपेश पिसाळ , सचिन जाधव , नाना कर्चे , गिरीष नाणेकर,योगेश थोपटे , विशाल निलख , दादा बर्डे , ज्ञानेश्वर आवारी यांचे पथकाने केलेली आहे.