पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील एका शाळेच्या स्कूल बस चालकाने १५ वर्षाच्या मुलीवर बसमध्येच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.मुलीला रिलेशनशिपमध्ये राहणार
का असे विचारुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सोमेश्वर घुले पाटील वय ३५, रा. वडाची वाडी, उंड्री याला अटक केली आहे. हा प्रकार मार्च, जून आणि १६ जुलै रोजी घडला होता. याबाबत उंड्री येथे राहणाऱ्या एका १५ वर्षाच्या मुलीच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुलगी ही सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कुल बसमधून शाळेत ये जा करीत होती. त्या दरम्यान त्यांच्यात ओळख झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. रिलेशनशिप म्हणजे काय हे मुलीला माहिती नसताना तिने होकार दिला.
तेव्हा त्याने तिच्याबरोबर मार्च, जून २०२२ मध्ये जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. १६ जुलै रोजी ही मुलगी घरी उशिरा आली. तेव्हा तिच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी मुलीकडे सखोल चौकशी केली. तेव्हा तीने सर्व हकीकत सांगितली, आणि ४ जणांनी अत्याचार केल्याचे देखील सांगितले.
परंतू पोलिसांनी चौकशी केली असता बसचालका बरोबरील प्रकरण समोर येऊ नये यासाठी चार जणांवर आरोप देखील लावला, परंतु चौकशीत घुले यानी अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.