पुण्याच्या वानवडी परिसरातील एका सोसायटीत एस.बी तील पोलिस निरीक्षकाच्या मुलीचा आणि पत्नीचा राडा. पोलिसांवर हात उचलल्याची चर्चा?

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

वानवडी परिसरातील ऑक्सफर्ड व्हिलेज सोसायटीच्या गेटवर पुण्यातील पोलिस निरीक्षकाच्या मुलीनं आणि पत्नीनं राडा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . ही घटना दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा घडली आहे. पोलिस निरीक्षकांची मुलगी ही मद्यधुंद अवस्थेत होती असा आरोप सोसायटीमधील रहिवाशांनी केला आहे.

1 – VIDEO https://www.instagram.com/reel/C1l1hUhqOJz/?igsh=MWQ0bnRlaDBoZzg1ZQ==

नागरिकांनी घटनेबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राडा घालणार्‍या महिला असल्याचे समजल्यानंतर महिला पोलिसांना पाचारण करण्यात आलं. महिला पोलिसांसोबत देखील पोलिस निरीक्षकाच्या मुलीनं आणि पत्नीनं हुज्जत घातली. दरम्यान, त्यांना वानवडी पोलिस ठाण्याच्या मोबाईल-२ वाहनातुन पोलिस ठाणेमध्ये आणण्यात आलं. त्यावेळी दोघींनी महिला पोलिसांना देखील मारहाण केल्याची चर्चा सुरू आहे.

2- VIDEO  https://www.instagram.com/reel/C1l16Pcqg4q/?igsh=MXJlejI1dmZrZXAxNA==

पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आणल्यानंतर देखील दोघींनी राडा घातला. एवढेच नव्हे तर पोलिस निरीक्षकाची मुलगी महिला पोलिस कर्मचार्‍याच्या पाठीमागे दगड घेवून त्यांना मारण्यासाठी धावत गेली होती असं सांगण्यात येत आहे. पोलिस निरीक्षकाच्या मुलीनं आणि पत्नीनं राडा घातल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती घेतली असता दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वानवडी पोलिस ठाण्यातून सुत्रांनी माहिती दिली आहे. परंतु पोलिस निरीक्षक दत्ता बागवे यांची मुलगीने पोलिसांवर दगडाने हल्ला करूनही सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल केलेला नाही.साधे सोपा गुन्हा दाखल केला आहे.

असाच प्रकार दुसरा कोणी केला असता तर पोलिसांनी बदळून सरकारी कामात अडथळा व्यतिरिक्त अनेक गुन्हे दाखल करून प्रमाणिक पणे ड्युटी पार पाडली असती. अशी चर्चा सदरील सोसायटीत व पोलिस ठाण्यात ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here