पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
चोरांची मजाल आता वाढायला लागली असून शासकीय जागेत पार्क केलेले वाहनच चोरीला गेल्याने शासकीय कार्यालयातील कागदपत्रे सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यातील मामलेदार कचेरीतून टाटा हायवा ट्रक वाळू सहित चोरीला गेल्याची घटना घडली आहे.खडक पोलिस ठाण्यात ३६९/२०२२, भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील फिर्याद ३६ वर्षांच्या एका महिला अधिकारीने दिली आहे. सदरील घटना २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर कालावधीत घडली आहे.
तहसीलदार हवेली कार्यालयाचे आवारातील नवीन बांधकामाच्या लगतच्या मोकळ्या मैदानात २ लाख रुपये किमंतीचा टाटा हायवा कंपनीचा पांढ-या रंगाचा ट्रक नं.एम.एच/१६/टीसी ४१०० व त्यामध्ये भरलेली वाळु १८ हजार रूपये किमंतीचे असे एकुण २ लाख १८ हजार रूपयाचे ऐवजासह कोणीतरी अज्ञात इसमाने ट्रकसह स्वतःचे आर्थिक फायदयाकरिता चोरी करून नेला आहे. थेट ट्रक चोरीला गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक सुरज कुतवळ करीत आहेत.