अबब.. पुण्यात १ कोटी ३१ लाखांचा एम.डी अंमली पदार्थ जप्त; पती पत्नीला पोलिसांनी केली अटक

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील अंमल पदार्थ विरोधी पथकाने तब्बल १ कोटी ३१ लाखांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.आज रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक -१ गुन्हे शाखे कडे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली, नालंदा गार्डन रेसीडन्सी,बाणेर ठिकाणी एक नायजेरियन पती पत्नी राहत असुन ते रहाते घरातुन कोकेन एम.डी असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर यांनी सदरील ठिकाणी जाऊन छापा घातला, त्यात नायजेरियन इसम नामे १ ) उगुचुकु इम्पॅन्युअल (IYI Ugochukwu Emmanuel), वय ४३ वर्षे, रा,नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नंब १३ बाणेर. मुळ नायजेरीया व २) ऐनीबेली ओमामा व्हिवान (Enebeli Omamma Vivian), वय ३० वर्षे, रा. नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नं. १३ बाणेर पुणे. मुळ नायजेरीया हे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ६४४ ग्रॅम ( एम.डी)

मॅफेड्रॉन ९६ लाख ६० हजार रुपयांचा व २०१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन ३०, लाख १६ हजार ८०० व रोख रुपये २ लाख १६ हजार मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या व डब्या असा एकुण १ कोटी ३१लाख ८ हजार ८०० चा अंमली पदार्थ व ऐवज ते रहात असलेल्या घरात अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे.

त्यांचे विरुध्द एन.डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क),२१(क),२२(क),२९ अन्वये महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक, शैलजा जानकर यांनी फिर्याद दिल्याने आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लक्ष्मण ढेंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here