मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी दिलेर ऊर्फ बॉम्बे याला अंमली पदार्थाची (एम.डी) विक्री करताना अटक.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमली पदार्थ विक्री करताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान, वय-३४ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा- स.नं. ५७०, गल्ली नं. ५,आंबेडकरनगर, मार्केटयार्ड याने आंबेडकरनगर परीसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी स्वतःचे ताब्यात मिळुन आल्याने त्यास मार्केटयार्ड पोलीसांनी स्टेशन येथे अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हाद्दीत वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील आरोपी, चेक करणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे दिमतीत तपास पथकातील कांबळे, थोरात, हिरवाळे, पोटे, जाधव, झायटे, यादव, तायडे यांचेसह रात्री खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पोलिस.ठाणेच्या हाद्दीत रवाना झाले.आणि वाहनाने मार्केटयार्ड मधून बैलबाजार येथे पेट्रोलींग करीत जात असताना बैलबाजार येथे शेडच्या बाजुला दि.१८ जानेवारी २०२४ रोजी गल्ली नं.१४ आंबेडकरनगर, मार्केटयार्ड येथे आले असता,सार्वजनिक शौचालय भिंतीचे आड एक इसम संशयास्पदरित्या बसलेला दिसून आला.सदरील इसम अंधारात का बसलेला आहे हे पाहणे करीता त्याचे जवळ जात असता रेकॉर्डवरील दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान असा दिसला, तो पळून जात असता.

दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान यास पकडले त्यावेळी सहा. पोलिस निरीक्षक कांबळे यांनी त्यास तु का पळून जात होतास असे विचारले असता त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सहा पोलिस निरीक्षक कांबळे यांनी त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता, तो सदर ठिकाणी एम.डी. हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचे सांगीतले असुन शेख याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ ४.६१० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण १३ हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०६/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास कांबळे करीत आहेत.

सदरची कारवाई रितेश कुमार पोलीस आयुक्त,पुणे शहर,रामनाथ पोकळे,सह पोलीस आयुक्त, शहर,रंजनकुमार शर्मा,अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर,आर. राजा, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर,शाहुराव साळवे, सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांबळे, सोबत,थोरात,हिरवाळे,जाधव, झायटे, यादव,तायडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here