रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने चोरुन नेणारे आरोपी जेरबंद, १४ मोबाईल व वाहन जप्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरामध्ये येणा-या पालखी आगमनाचे अनुषंगाने व युनिट १ कार्यक्षेत्रात होणा-या मोबाईल जबरी चोरीच्या अनुषंगाने युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांबद्दल माहिती घेत असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हत्ती गणपती मंदिराचे समोरील बोळामध्ये सदाशिव पेठ, येथे तीन इसम हे काळे रंगाचे मोटार सायकलवरुन मोबाईल विक्रीसाठी येणार असुन सदरचे मोबाईल चोरीचे आहेत.

लागलीच युनिट-१ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी टिम तयार करुन ती गणपती मंदिराचे समोरील बोळामध्ये सदाशिव पेठ येथे तीन इसम आल्यानंतर खात्री झाल्यानंतर त्यांना सदर ठिकाणी सापळा लावुन छापा टाकून सदर इसमास आहे.

त्यास्थितीत ताब्यात घेवून पंचासमक्ष त्यांना त्याचे नावे पत्ते विचारता त्यांनी आपले नावे पत्ते १) धनराज शिवाजी काळुंके वय २१ वर्षे रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर जवळ वडगांव शेरी पुणे २) विरेंद्रकुमार जगदीश प्रसाद प्रजापती, वय २५ वर्षे रा. १३, ताडीवाला रोड, मेरु हॉटेल जवळ पुणे ३) किशोर सुरेश कोल्हे वय ३० वर्षे रा. गवळी गल्ली, सारथी शाळेशेजारी, साईनाथ नगर, वडगांव शेरी पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यात १ लाख २१ हजार चे १४ मोबाईल व ७० हजार किंमतीची दुचाकी मोटर सायकल असे एकुण १,लाख ९१ हजार किंमतीचा माल पंचासमक्ष ताब्यात घेवुन जप्त करुन पंचनामा केला आहे.त्यांचे कडून खालील प्रमाणे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

१) विश्रामबाग,२) फरासखाना,३) समर्थ, ४) दत्तवाडी, ५)बंडगार्डन त्यांचे कडुन मोबाईल जबरी चोरीचे विश्रामबाग पो स्टे कडील २ गुन्हे, समर्थ पोलीस ठाण्याकडील ३ गुन्हे, फरासखाना, दत्तवाडी, बंडगार्डन पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी १ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहे.सदर इसमांना पुढील कारवाई कामी विश्रामबाग पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. धनराज शिवाजी काळुंके वय २१ वर्षे रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर जवळ वडगांव शेरी पुणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर वाहनचोरीचे एकुण ६ गुन्हे दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१,सुनिल पवार, यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद,सहा पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, रमेश तापकिर, अजय जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे,शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, आय्याज दड्डीकर, अभिनव लडकत, इमरान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई,आण्णा माने, तुषार माळवदकर व महेश बामगुडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here