कारवाई काय केली हे अधिकाऱ्यांकडून गुलदस्त्यात?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील भवानी पेठ येथील काशेवाडी भागामध्ये रेशनिंगचा धान्य विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खडबडून जागे झालेली यंत्रेणेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
काशेवाडी भागात नागरिकांकडून रेशनिंगचे धान्य घेऊन ते चालू बाजारभावाप्रमाणे बाहेर विकणारी टोळी सक्रीय झालेली आहे. त्या टोळीकडून आठ-दहा रुपयात नागरिकांकडून रेशनिंगचे तांदूळ घेऊन गिरणी चालकांना विकला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
महिला पोलिसाशी अनैतिक संबंध,पोलिस कर्मचारी जाधव याला अटक
तर एका तक्रारदाराने रेशनिंगच्या धान्याची अफरातफर बाबतीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संपर्क साधून तक्रार केल्यावर पुरवठा विभागाची यंत्रणा कामाला लागली,व ७ ते ८ क्विंटल धान्य एका दुकानातून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
परंतु ते धान्य साठवणारे गोदाम कोणाचे होते? त्याचं नाव काय? कारवाईत कोण कोण अधिकारी शामिल होते? धान्य खरंच ७ क्विंटल होतं का? धान्य कोणत्या नागरिकांनी विकले? हे सर्व प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे.
अधिकाऱ्यांकडून ऐवढी गुप्तता का बाळगली जात आहे. विशेष म्हणजे ज्या अधिका-यांच्या भागात धान्य धरण्यात आले आहे ते अजूनही अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयातील एका तहसिलदारांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळाली नाही.