फोटो काढना ईचलान मशिनीचाच वापर व्हावा
वैयक्तिक मोबाईल मध्ये फोटो न काढण्याच्या सूचना
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणा-या नागरिकांचे फोटो काढून नंतर अपलोड करून कारवाई केली जाते, तर काही वेळा सेटलमेंट करून वाहने सोडली जातात.परंतू आता वाहतूक पोलिसांना स्वताच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या मोबाईल मध्ये फोटो न काढण्याचे आदेश पारित झाले आहे.
फक्त ई-चलान मशीनद्वारे फोटो काढून कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व देण्यात आले आहेत. त्यामुळे जे वाहतूक पोलीस कारवाई करताना आदेशाचे पालन करताना दिसून येणार नाहीत,
त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी दिली आहेत. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. त्या पूर्वीच २०२० मध्ये वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटक प्रमुखांना व नोडल अधिकाऱ्यांना पत्राद्वारे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर न करता सर्व कारवाई ई-चलान केली जाईल याबाबत खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आल्या होत्या.
मात्र तरी देखील त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून होताना दिसून येत नसल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे पुन्हा एकदा अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभागाकडून सूचना देण्यात आले आहेत.
आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून नंतर ई-चलान मशीनमध्ये अपलोड करतात तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता केवळ नंबर प्लेटचा फोटो टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखण्यास अडचणी निर्माण होते, याबाबतचा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अर्ज केल्याने पोलीस महासंचालक कार्यालय वाहतूक विभाग मुंबई येथून पुन्हा नव्याने आदेश देण्यात आले आहेत.