पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी, सिनेकलाकार जाहिराती मध्ये कधी कधी काय दाखवतील या बद्दल न सांगितलेच बरं, वाहतूक पोलीस आपल्या जिवाची पर्वा न करता उन्हात, पावसाळ्यात, हिवाळ्यात आपले काम चोख बजावत असतात, त्यांच्यावर अनेकवेळा टिकाटीपणी देखील होत असते, असेच सिनेअभिनेत्री आलिया भट्ट याने ट्राफीक पोलिसांन बद्दल जी जाहिरात केली आहे. त्या बद्दल पुण्यातील एडवोकेट वाजेद खान यांनी तक्रार दाखल केली आहे.
हकीकत अशी की आलिया भट्ट सध्या “फोन पे” या एप्लीकेशन (APP) ची जाहिरात करत असून त्या जाहिराती मध्ये वाहनाचे इन्शुरन्स नसल्याने ट्राफिक पोलीस आलिया भट्ट व अमिर खान याला अडवून इन्शुरन्स बाबतीत विचारणा करत आहे.
विचारणा करणा-या ट्राफिक पोलिसाला सिनेअभिनेत्री आलिया भट्ट व सिनेअभिनेता अमिर खान हे लॉलीपॉप दाखवत असल्याचे दिसून येत आहे. परंतु असे लॉलीपॉप दाखवल्याने पोलिसांबद्दल बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असणार आहे.
तसेच एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला लाच स्वरूपात लॉलीपॉप देणे हा गुन्हा असून ते लॉलीपॉप देतानाचे जाहिरातीतील दृश्य कट करण्यासाठी एडवोकेट वाजेद खान यांनी तक्रार दाखल केली असून ते पुढील न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.