मुंढव्यातील हॉटेल मेट्रोमध्ये दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या ३ पोलिसांना अतिरिक्त आयुक्तांनी केले निलंबित

0
Spread the love

गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

दारू पिऊन मुंढव्यातील हॉटेलमध्ये धिंगाणा घालणारे तीन पोलिसांवर गुन्हे दाखल झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरुन अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर यांनी ३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काल मंगळवारी काढले आहेत.

pune crime news | पुण्यातील हॉटेलमध्ये  धिंगाणा घालणाऱ्या  ३ झिंगाट पोलिसांवर गुन्हे दाखल; पोलीस खात्यात उडाली खळबळ

या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.पुणे वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक १) अमित सुरेश जाधव,चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार २) योगेश भगवान गायकवाड, फरासखाना पोलीस ठाण्यातील ३) उमेश मरीस्वामी मठपती अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here