पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला अनैतिक कारणांसाठी फुस लावून पळवून नेऊन तिचा गळा दाबून खून करणा-या सराईत गुन्हेगारास विमानतळ पोलीसांनी अटक केली आहे.विमानतळ पोलिसांना ससून हॉस्पिटल कडून खबर मिळाली चेतन सोमनाथ मिसाळ, वय २३ वर्षे, रा. लेन नं. ९, नर्मदा कॉम्प्लेक्स, लोहगांव, याने अल्पवयीन पिडीत हिला गळ्याभोवती व्रण असलेले व बेशुध्द अवस्थेत उपचार कामी ससून हॉस्पिटल येथे आणलेले आहे. डॉक्टरांनी ती तपासणीपुर्वी मृत झाल्याचे घोषित केले असल्याचे कळविले. त्यावेळी चेतन मिसाळ याने डॉक्टरांना त्याची पत्नी अल्पवयीन पिडीत हिने गळफास घेतल्याचे सांगून तो ससून हॉस्पिटल मधून निघून गेला होता.परंतू पोस्ट मार्टम अहवालामध्ये पिडीतेचा मृत्यु गळा आवळल्यामुळे झाल्याचे समजून आले.
त्यादरम्यान विमानतळ पोलिसांकडून त्वरीत मयत मुलीचे राहते पत्त्यावर जाऊन तपास करून तिचे नातेवाईकांबाबत माहिती घेतली, तिचे आईचा शोध घेऊन तिला घटनेची माहिती दिली.तिच्याकडे अधिक माहिती घेतली असता, मयत अल्पवयीन पिडीत ही १३ वर्षाची असताना तिला चेतन ऊर्फ आकाश सोमनाथ मिसाळ याने पळवून नेले होते. त्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात त्याला अटक करण्यात आली होती.
अल्पवयीन पिडीत हिला आई, वडीलांकडे रहायचे नसल्याने न्यायालयाचे आदेशाने तिला एस.ओ.एस.बालग्राम, येरवडा, पुणे येथे दाखल करण्यात आले होते.अल्पवयीन पिडीत हिला एस.ओ.एस.बालग्राम कडून शिक्षणासाठी नेताजी विद्यालय, येरवडा येथे पाठविण्यात येत असताना डिसेंबर २०१९ मध्ये तिला पुन्हा कोणीतरी पळवून नेल्याने सदर संस्थेचे तक्रारीवरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दरम्यानचे काळात चेतन ऊर्फ आकाश सोमनाथ मिसाळ याने अल्पवयीन पिडीत हिचेशी शरीरसंबंध ठेऊन त्यातून तिने एका मुलास जन्म दिलेला आहे. तसेच चेतन मिसाळ हा अल्पवयीन पिडीत व त्यांचे १ वर्षाचे मुलास सोबत घेऊन कोणास माहित न होता लेन नं. ९. नर्मदा कॉम्प्लेक्स, लोहगांव, येथे भाड्याने राहत होता. काही दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलीने तिचे आईला भेटून चेतन मिसाळ हा दारू पिवून तिच्याशी सतत भांडण करून तिला मारहाण करीत असल्याचे सांगितले होते.
अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेऊन चेतन मिसाळ यानेच तिचा गळा आवळून खून केल्याची तक्रार मयत अल्पवयीन पिडीतीचे आईने दिल्याने चेतन मिसाळ याचे विरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात ४०७/२०२२ भा.दं. वि.क.३०२, ३२३,३६३.३६६(अ). बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ५ (जे) (२). ५ (एल).६ प्रमाणे दि.२७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गळा आवळून खून केलेला असल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
वरील कामगिरी नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,
रोहिदास पवार पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४,आरती बनसोडे, सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, एस.एन.लहाणे, महिला रत्ना सपकाळे यांनी केलेली आहे.