पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
विमानतळ पोलीसांची धडक कारवाई करत १ पिस्टल २ जिवंत राऊंड एका कडून जप्त केले आहे.विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,पोलीस निरीक्षक, गुन्हे, मंगेश जगताप पोलीस उप निरीक्षक रविंद्र
ढावरे असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,पोलिस नाईक गिरिष नाणेकर व सचिन जाधव यांना त्यांचे बातमी दारांमार्फत बातमी मिळाली की,खुळेवाडी कॉर्नर पुणे नगर रोड येथे मोकळया मैदानात एक इसम थांबलेला असुन त्याचे कडे पिस्टल व राऊंड असुन तो कोणाची तरी वाट पाहत आहे.
त्याप्रमाणे सापळा लावुन संतोष शंकर गुंजाळ वय २६ वर्ष रा. स.नं. १६५, दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर यास पकडले असता त्याचेकडे ५०हजार २०० रुपये किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत राऊंड मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आलेले आहेत. सदर इसमाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४५० / २०२२ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच सदरचा पिस्टल कोठून व कशासाठी आणले होते याबाबत पुढील तपास सहा पोलीस फौजदार अविनाश शेवाळे हे करीत आहेत. विलास सोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे,अविनाश शेवाळे, सचिन कदम,सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरिष नाणेकर,अंकुश जोगदंडे,नाना कर्चे,योगेश थोपटे, संजय आसवले यांचे पथकाने केली आहे.