आरटीओ कारवाई करेना आणि वाहतूक शाखेचे हात दंडात्मक कारवाईसाठी पुढे होईना?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरात बिनदिक्कतपणे चारचाकी गाडयांवर अंबर दिवा लावून मिरवलं जात असतानाही शासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याचा सोंग घेत आहेत. याबाबतीत समाजिक कार्यकर्ते आदिल शेख यांनी पुणे आरटीओ व मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.

आजरोजी कोणालाही चारचाकी गाडयांवर अंबर दिवा वापरण्याची परवानगी दिली गेली नसतानाही बिनदिक्कतपणे चारचाकी गाडयांवर अंबर दिवा लावून मिरवताना दिसत आहे. अंबर दिवा लावून व्हिडिओ, रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून आम्ही अमुक तमुक असल्याचे व दंडाधिकारी असल्याचे भासवले जात आहे.

MH 14 JM 9899 पांढऱ्या रंगाची फोर्ड कार वर अंबर दिवा लावून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. तर MH 12 JC 2740, MH O9 BW. 4000 पजेरो, MH 42.BE.3335 MH.46.BE.0363, MH.12.JK.2036,आणि इतर सदरील वाहने कमी वयातील मुले अंबर दिवा लावून फिरत असल्याचे दिसून आल्याने शेख यांनी लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

” अंबर दिवा लावण्याची परवानगी कोणाला? “
पुणे सिटी टाईम्सने अंबर दिवा संदर्भात माहिती घेतली असता पुणे आरटीओने कोणाला ही म्हणजे तहसीलदार, नायब तहसीलदारांना परवानगीच नसल्याचे समोर आले आहे. तर विषेश म्हणजे पुणे जिल्हाधिकारी यांनी देखील कोणत्याही अधिकाऱ्याला अंबर दिवा वापरण्याची परवानगी दिली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मग परवानगीच नसेल तर कोणाच्या आशिर्वादाने अंबर दिवे लावून मटकत आहेत. आणि अंबर दिवे आणतात तरी कुठून याची देखील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.