ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेली हत्यारबंद टोळी जेरबंद,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ; प्रतिनिधी. ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेली हत्यारबंद टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर रोजी पेट्रोलींग करित असताना पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर,यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरिल सराईत गुन्हेगार आजीम शेख व त्याचे साथीदार हे पंचतारा बिल्डींग मधील मातोश्री ज्वेलर्स, सर्व्हे नं- १३२ दांडेकर पुल, पुणे या दुकानावर दरोडा टाकण्याचे तयारीत आहे.

आणि दांडेकर पुल बस स्टॉप जवळ सार्वजनिक रोडचे कडेला दबा धरुन थांबलेले आहेत. माहितीचे अनुषंगाने वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शन खाली युनिट -३ कडील स्टाफने ज्वेलर्सचे दुकान हे ५ इसम लुटण्याचे तयारीत असल्याची खात्री झाल्याने अचानकपणे सदर ठिकाणी छापा टाकुन १) आजीम सलीम शेख वय २२ रा.कॉलनी नं १०,म्हसोबा मंदीरा शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे. २) हंसराज संजय परदेशी, वय २१ वर्ष, धंदा एसी रिपेरिंग रा. म्हसोबामंदीर शेजारी, ३११भवानी पेठ,

काशेवाडी, पुणे. ३)योगेश बाबा चौधरी,वय-२४ वर्षे, रा म्हसोबा मंदीर, १० नं कॉलनी समोर, काशेवाडी, भवानीपेठ, ४)अजय खंडु कदम, वय-३० वर्षे, रा. चमनशहा चौक, काशेवाडी, भवानीपेठ, पुणे ५)संतोष विष्णु अडसुळ, वय २२ वर्षे, रा.कॉलनी नं १०,म्हसोबा मंदीरा शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ अशी नावे असल्याचे सांगितले.

त्यांना सदर ठिकाणी एकत्र येण्याचे कारण विचारले असता ते सर्वजण खरी माहिती सांगणेस टाळाटाळ करीत होती.प्राथमिक चौकशी करता १ ते ४ हे रेकॉर्ड वरिल गुन्हेगार असून पुणे शहरात खडक, लष्कर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यात त्यांचे विरुध्द घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यांचे कब्जात व घटनास्थळावर एक लोखंडी कोयता, नायलॉनची दोरी, मिरची पुड, चाव्या, रोख रक्कम व २ दुचाकी असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडुन पोलीस कस्टडी घेऊन आरोपीतांकडे अधिक तपास करता, हिंजवडी पोलीस ठाणे,विमानतळ पोलीस ठाणे, खडक पोलीस ठाणे,कोंढवा पोलीस ठाण्यात असे ५ गुन्हे केल्याचे उघड करण्यात आले आहे.

त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्तअमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे. श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे

मार्गदर्शनाखाली युनिट -३ चे अभय महाजन,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
अमृता चवरे सहा.पोलीस निरीक्षक, दत्तात्रय काळे पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार संतोष क्षिरसागर राजेद्र मारणे,महेश निबांळकर, विल्सन डिसोझा, संजिव कंळबे,कल्पेश बनसोडे,सुजित पवार,सोनम नेवसे, दिपक क्षिरसागर, प्रकाश कट्टे,ज्ञानेश्वर चित्ते,राकेश टेकावडे,भाग्यश्री वाघमारे,यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here