हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा शिक्षण विभागाने मागविला चौकशी अहवाल.

0
Spread the love

५ वी ते ७ वी तुकड्यांना मान्यता नसल्याची धक्कादायक माहिती आली होती समोर.

” पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट “

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेची ५ वी ते ७ वी तुकडी मान्यता नसल्याची तक्रार अजहर अहमद खान यांनी केली होती. त्याची दखल पुणे महानगर पालिका शिक्षण विभागाकडून घेतली जात नसल्याने खान यांनी मंत्रालय गाठून चौकशी मागणी केली होती. दरम्यान सदरील समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेने २०℅ अनुदानावरुन ४०% अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

तेवढ्यात मंत्रालयातून खान यांची त्या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश पारित झाले होते. त्यानंतर २० मार्च २०२३ रोजी पडताळणी प्रस्ताव सादर करण्यात आला. व प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग ( प्राथमिक) पुणे महानगर पालिका मिनाक्षी राऊत यांनी २८ जून २०२३ रोजी इयत्ता ५ वीच्या वर्गास शासन मान्यता नाही.

तसेच इयत्ता ६ वी, ७ वी नैसर्गिक वाढ विभागीय शिक्षण उपसंचालक यांची मान्यता नाही. सबब इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम वर्ग अमान्य. तर इयत्ता १ ली ते ४ थी प्रथम वर्गावरील शिक्षकांचे शालार्थ आयडी नसल्याने सद्यस्थितीत २०℅ वरून ४०% टक्के अनुदानासाठी स्थगित. असे अश्याचे पत्र काढले होते.

त्या संदर्भात २२ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे सिटी टाईम्सने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन पुणे महानगर पालिका शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. स्वयंस्पष्ट अहवाल मागविला आहे. तर सदरील चौकशी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शंकर मांडवे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here