गुन्हे शाखा, युनिट-२ ची कारवाई
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
स्वातंत्र दिनानिमित्ताने कोबींग ऑफरेशन गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना,पोलीस अंमलदार समीर पटेल व कादीर शेख यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली, दहशत पसरवुन मोबाईल जबरदस्तीने मोपेड गाडीवर येवुन हिसका मारणारा मोबाईल चोर हा स्वतःजवळ कोयता बाळगुन तो आशु कमेला मजिद कोंढवा, पुणे येथे उभा असलेल्याची बातमी मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे व कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयीतास ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रसाद नानासाहेब आव्हाढ वय २० वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले.
त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडती मध्ये २ मोबाईल व कोयता असा एकुण सर्व मिळुन ३७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. त्याच्याविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला असुन, त्याच्याकडे असलेले दोन्ही मोबाईलचे तांत्रिक विष्लेशन केले असता दोन्ही मोबाईल हडपसर,भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरले आहे.
सदरील कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलीस उप-निरीक्षक, राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे व पोलीस अंमलदार समिर पटेल,कादीर शेख,गजानन सोनुने, शकंर नेवसे,प्रमोद कोकणे, उज्वल मोकाशी, निखील जाधव, उत्तम तारु, मोसीन शेख, गणेश थोरात, साधना ताम्हाणे,रेश्मा उकरंडे यांनी केली आहे.