शिपाई देता का शिपाई म्हणण्याची आली वेळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील मध्यवस्तीत असलेले रेशनिंग कार्यालयात शिपाई नसल्याने नागरिकांची कामे रेंगाळली असून शिपाई देता का शिपाई अशी म्हणण्याची वेळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आली आहे.
मध्यवस्तीत असलेले ग” परिमंडळ कार्यालय हे झोपडपट्टयांनी व्यापलेले असून रेशनिंग कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. जेमतेम कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने त्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
शिपाई लता सणस ह्या एक वर्ष झाले निवृत्त होऊन,तरी अद्यापही कार्यालयीन कामकाजासाठी शिपाई मिळालं नाही. विशेष म्हणजे ग” परिमंडळ अधिकाऱ्यांनी ५ वेळा अन्नधान्य वितरण कार्यालयाला पत्रव्यवहार करूनही त्या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही.
यामुळे परिमंडळ कार्यालयात एजंटांचा वावर वाढलेला असून शिपाई नसल्याने एजंट शिधापत्रिका लिहत असल्याचे नागरिकांनी निर्दशनास आणून दिले आहे.
तर कर्मचारी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. अधिक माहितीसाठी ग”परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.