चौकीला कोणीच नसल्याने नागरिकांनी तक्रार करायची तरी कोणाकडे, नागरिकांचा संतप्त सवाल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कडक पोलिस ठाणे म्हणजे खडक पोलीस ठाणे त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ पोलिस चौकीला कोणीच वाली नसल्याने नागरिकांना तासंतास ताटकळत उभे राहवे लागत असल्याने नागरिकांनी दुसऱ्यांदा नाराजी व्यक्त केली आहे.
घोरपडे पेठ पोलिस चौकीला कोणी वाली देता का वाली या सदराखाली यापूर्वी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सदरील चौकीला वाली देखील भेटले होते. परंतु आता पुन्हा काही दिवसांपासून सदरील चौकीत कोणीच उपस्थित राहत नसल्याची व्यथा नागरिकांनी पुणे सिटी टाईम्स कडे मांडली आहे.
घोरपडे पेठेतील मक्का टावर येथील फिरोज खान यांचा ७ फेब्रुवारीला सलॅडिंग अॅलुमिनियम चा माल रात्री चोरीला गेला, त्याची तक्रार करण्यासाठी खान हे सकाळी ११ वाजता घोरपडे पेठ पोलिस चौकीत गेले होते.
सदरील चौकीचा दार बंद होता, तर त्या नंतर वाट बघून थेट पोलिस ठाण्याला गेले असता त्या ठाण्यात पण पहिले उडवाउडवीची उत्तरे दिली गेली, त्यानंतर लोहियानगर पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांचा नंबर देण्यात आला. त्या कर्मचाऱ्यांना फिरोज खान यांनी विचारणा केली असता त्यांनी लोहियानगर पोलीस चौकीत नाही तर घोरपडे पेठ पोलिस चौकीला संपर्क साधण्याचे सांगितले.
खान हे पुन्हा दोन वेळा चौकीत गेले असता तरीही तेथे तक्रार नोंदवण्यासाठी कोणीच नव्हते, तर केबीनला लॉक होते. तसेच ३ तास ताटकळत उभे राहून ही त्यांच्या हाती निराशाच आली आहे. खान शेवटी तक्रार न करताच माघारी निघून गेले.
एखादं मोठ्ठं अपघात झाला किंवा इतर प्रकार घडला तर यासाठी जबाबदार कोणाला धरणार? चौकीत कोणीच नसेल तर चौकीच बंद ठेवावी अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. चौकीत नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.