लिफ्टच नसल्याने पायऱ्या चढताना ज्येष्ठांना सुटतोय आहे घामच घाम,
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, अन्नधान्य ब” परिमंडळ कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांची दमछाक होताना दिसत आहे. सध्या सगळीकडे आय.एस.ओ मानांकनाचे कामकाज जोमाने सुरू असले तरी नागरिकांची तिसऱ्या मजल्यावर चढून जाऊस्तर दमछाक होत असताना नागरिकांची चिंताच अधिका-यांना नसल्याचे दिसत आहे.
अन्नधान्य ब” परिमंडळ कार्यालयाच्या हद्दीत ताडीवाला रोड, बी.टी. कवडे रोड, मुंढवा,कॅम्प, भवानी पेठ, काशेवाडी व इतर भाग येत आहेत. सदरील परिमंडळ कार्यालय हे २०१७ साली शिवाजी नगर शासकीय गोदामातून हलविण्यात आले होते.
त्या वेळी पुणे रेल्वे स्टेशन येथे हलविण्यात येणार असल्याने नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला विरोधही केला होता. तसेच त्यावेळी तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदने देखील देण्यात आली होती.
परंतु तत्कालीन परिमंडळ अधिकाऱ्यांच्या चुकिचया माहितीला बळी पडत, वरिष्ठांनी पुणे रेल्वे स्टेशन जवळील एका इमारतीत बसस्थान बसविले, परंतु त्याचा परिणाम आता नागरिकांना भोगावा लागत आहे.
तिसऱ्या मजल्यावर चढून जाऊस्तर नागरिकांचा जीव वर खाली होताना दिसत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना पायर्या चढताना दिवसातच “तारे” दिसायला लागत आहे. लिफ्ट नसल्याने ज्येष्ठांना व महिलांना जास्त प्रमाणात चढण्याचा त्रास होत आहे.
एखादे कागद विसरले किंवा झेरॉक्स काढायचे म्हटले तर पुन्हा वर खाली करायची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे अपंग व्यक्तींना याचा सर्वाधिक मानसिक त्रास होत आहे. जुनी जिल्हा परिषद मध्ये अनेक खोल्या, कार्यालय रिकामे पडलेले असतानाही त्या ठिकाणी ब” परिमंडळ कार्यालय का हलवले जात नाही? जुनी जिल्हा परिषद मध्ये ह”म” परिमंडळ कार्यालय असू शकते तर ब” परिमंडळ कार्यालय का नाही? नागरिकांच्या अडीअडचणी आत्तातरी पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले घेणार का?
नागरिकांच्या हितासाठी व सोईसाठी पुढील पाऊल उचलणार का? डॅशिंग म्हणून ओळखले जाणारे सचिन ढोले यांनी नागरिकांच्या हितासाठी तरी पाऊल उचलावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.