ना चौकशी ना कारवाई, मात्र सगळं आलबेल?
तहसिलदारांनाच महसूल वाढ नकोय का?
सक्षम अधिका-यांची नियुक्ती करण्याची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या पत्रांवर कारवाई करायची सोडून फक्त खुलासा मागविण्या पलिकडे हवेली तहसिलदारांकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
७ दिवसात खुलासा आला नाही तर पुढील कार्यवाही केली जाईल हे फक्त कागदावरच लिहिले चांगले दिसत असावे, कोंढव्यातील गौण खनिज उत्खनन संदर्भात ७ महिन्यांपासून लेखी तक्रारी असतानाही व तलाठ्यांकडून दुर्लक्ष केले जात असतानाही हवेली तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्याकडून कानाडोळा केला जात आहे?
हकीकत अशी की कोंढवा येथील अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात अजहर अहमद खान व वाजिद एस खान यांनी आवाज उचललेला असून त्या संदर्भात खान यांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांना समक्ष भेटून कोंढवा भागात सुरू असलेल्या अवैधगौण खनिज उत्खनन संदर्भात लक्ष घालण्याचे व तहसिलदारांनी स्वतः पाहणी करण्याची,अथवा वेळ देण्याची मागणी केली होती. परंतु तहसिलदारांनी अद्यापही वेळ दिली नसल्याचे खान यांनी सांगितले आहे.तर कात्रज तलाठी अर्चना वनवे यांच्या विरोधात लेखी तक्रारी असतानाही व दिशाभूल करणारा अहवाल सादर केला असतानाही वनवे यांच्यावर कारवाई तर झालीच नाही उलट त्यांना अभय देण्यात आल्याची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू आहे.तर तलाठ्यांवर तहसिलदारांचे नियंत्रण नसल्याचा आरोप खान यांनी केला आहे.लाखोंचा महसूल बुडत असताना तहसिलदारांचे विषेश दुर्लक्ष का? ठोस कारवाई करण्यास तहसिलदारांचे हात का कचरत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तलाठी अर्चना वनवे फुंदे यांच्यावर ७ दिवसात कारवाई झाली नाही तर लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचे खान यांनी सांगितले आहे.तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.