जिवंत माणसाला मृत दाखवल्याने परिसरात उडाली खळबळ.
पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने तक्रारदारांनी कोर्टात मागितले न्याय.
गुन्हा घडल्याचे दिसत असले तरी औरंगाबाद येथे जाऊन तक्रार दाखल करण्याचे पोलिसांचे पत्र.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे स्टेशन परिसरातील एका धार्मिक ट्रस्टचे ट्रस्टी जिवंत असतांना ते मरण पावले आहेत असे शपथपत्र पुण्यात तयार करून काही आरोपीनी औरंगाबाद येथील वक्फ कार्यालयात सादर केले, त्या संदर्भात पुणे स्टेशन येथील पोलीस चौकीत सदर ट्रस्टिंनी तक्रार दाखल केली होती,
त्यावर पोलिसांनी गुन्हा घडल्याचे दिसत असले तरी कागदपत्रे औरंगाबाद येथे सादर झालेली असल्याने औरंगाबाद येथे जाऊन तक्रार दाखल करण्याचे पत्र तक्रारदार सिराज शेख यांना दिले.
त्यावर त्यांनी ऍड समीर शेख यांच्या मार्फत पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्याकडे दाद मागितली .न्यायालयाने बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना या प्रकरणात तपास करण्याचे आदेश दिले आहेत.