३०७ कलमानुसार समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. (Samarth police station news)
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहीद शेख, वय ४८ वर्षे, रा.भवानी पेठ, यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या फिर्यादीवरून हैदरअली रफिक शेख, वय २८ वर्षे, रा.१६९,नाना पेठ,ए.डी.कँम्प चौक,ताजुद्दीन वाडा, आयना मस्जिदजवळ, याला अटक करण्यात आली आहे.
५ नोव्हेंबर रोजी राजेवाडी गणेश मंडळा समोर, ए.डी.कॅम्प चौकजवळ ,न्युनानापेठ यातील फिर्यादी यांचा भाऊ जावेद शेख यास हैदर रफीक शेख याने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन हातातील कडयाने त्याचे तोंडावर डोक्यावर,डोक्याचे वरील बाजूस जोरजोराने मारहाण करुन त्याला जबर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच अॅक्टीवा गाडीची तोडफोड केली व रस्त्याने जाणारे लोकांना भिती दाखवून दहशत केली व त्यामुळे लोकांची पळापळ होऊन दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याने सदरील भागात खळबळ उडाली होती. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एन.हाळे करीत आहे.