आळंदीला लग्न करण्यापुर्वी ? एडवोकेट वाजेद खान

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS)

आजची मुले वयात आली की,मै तुम्हारे बिगर जिंदा नही रह सकता। असे म्हणत एकमेकांचा कवळया वयात हात धरुन लग्न करण्यासाठी आळंदीला पोहचतात.कैसी ये तरी बारात सजना । ना ढोली है। कोई भी संगना । क्या करने है घोडे हाथी । तु मेरी मै तेरा साथी। या गाण्याच्या ओळीप्रमाणे लग्न करण्यासाठी आळंदीला येतात.कोणी ओळखीने येते, कोणी ओळखी शिवाय आळंदीला येते.मग तेथे उपस्थित असलेले एजंट मंडळी स्वस्तात लग्न लावून देवू असे म्हणून लग्न लावणाऱ्या मंगल कार्यालयात किंवा संस्थेकडे जातात.लग्न झाल्यावर त्यांना लग्नाचे प्रमाणपत्र मिळते सोबत काही अडचण आली तर पोलिस स्टेशनला देण्यासाठी एक पत्र मिळते. या दोन गोष्टीवर त्यांचा पुढील संसार सुरु होतो आणि मुलगा,मुलगी जेव्हा घरुन निघतात तेव्हापासून सगळयात पहिल्यांदा स्वतःचे मोबाईल बंद करतात.घरातून पलायन केल्यानंतर मोबाईल बंद करणे हि सगळ्यात मोठी चुक असते, परंतु पोलिस आपल्याला ट्रॅक करून मोबाईलच्या लोकेशनद्वारे आपल्यापर्यंत येईल या गोष्टीची त्यांना भिती वाटते.

मुलीचा जेव्हा फोन लागत नाही तेव्हा आई वडिल पोलिस कंम्प्लेट देतात आणि फोन बंद असेल तर पोलिसांनाही नाईलाजास्तव मिसींगची तक्रार घ्यावी लागत परंतु फोन जर चालू असेल तर पोलिस तक्रार घेत नाहीत. आपण आळंदीला गेले तर स्वस्तात लग्न स्वस्तात लग्न असे म्हणत चार-दोन एजंट आपल्याकडे येतात. या एजंट लोकांना कायदयातील काही माहिती नसते, एजंटाच्या एका चुकीमुळे तुमचे आयुष्य बरबाद होऊ शकते.

आळंदीला लग्न करण्यापुर्वी मुला मुलींनी भारती मुद्रांकावर आवडीने लग्न करत असल्याबाबत तसेच घरातून येताना कुठलीही मौल्यवान बाब सोबत आणलेले नाही याचे शपथपत्र बनवणे आवश्यक आहे.


बऱ्याच मुली लग्न करताना उत्साही असतात. लग्न झाल्यावर जेव्हा आई वडिल मुलीसमोर रडतात मै झहर खा के मर जाऊंगी।, तुझ्यामुळे नातेवाईक आमच्या तोंडात शेण घालतील, अश्या काही प्रश्नामुळे बऱ्याच मुलीचे मत परिवर्तन होते आणि त्या मुली मुलांच्या विरोधात तक्रार देण्यास तयार होतात. दोघांचे प्रकरण जेव्हा पोलिस स्टेशन मध्ये जातात तेव्हा स्वतःला समाजसेवक म्हणणारे काही एजंट लोक देखील त्याचा लाभ घेतात.

आळंदीला लग्न करताना लग्नापूर्वी एखादया वकिलाचा सल्ला घ्याव, स्वतःची कागदपत्रे सोबत ठेवावी, वयाचा पुरावा सोबत ठेवावा, स्वत मोबाईल बंद करु नये, पोलिसांचा फोन आला तर त्यांना स्पष्ट व खरे खरे सांगावे की आम्ही वयाने सज्ञान असून आवडीने लग्न केलेले आहे.

लग्नानंतर आळंदी मध्ये प्रमाणपत्रासोबत पोलिस स्टेशनमध्ये देण्यासाठी एक अर्ज बनवून देतात. सदरील अर्ज देण्यासाठी जेव्हा आपण पोलिस स्टेशन मध्ये जातो तेव्हा पोलिस सर्व नातेवाईकांना बोलून घेतील.त्यामुळे हा अर्ज कधी दयायचा आहे, केव्हा दयायचा आहे. याची खरंच गरज आहे हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे.आळंदीला लग्न करण्यापूर्वी अॅड. वाजेद खान तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील.वाजेद खान (बिडकर) मो.नं. ९८९०२१४९२०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here