घोरपडे पेठेत निवडणुकीपूर्वीच बॅनरबाजी, हेमंत रासनेंचे बॅनर काडून लावले आमदारांचे बॅनर.
नागरिक म्हणतात बॅनर बाजी नका करू काम करा काम?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील कसबा पेठेतील घोरपडे पेठेतील न्यू मोमीनपुरा कब्रस्तान ( दफनभूमी) समोरील ड्रेनेज लाईनचे घाण पाणी काही दिवसांपूर्वी वाहत असल्याने नागरिकांनी नाराज व्यक्त केली होती. तर आठवडाभर पाणी रस्त्यावर धो धो वाहत असल्याने दफनभूमी मध्ये येणाऱ्या मयतीला सुध्दा घाण पाण्यातून जावे लागत होते. पुणे सिटी टाईम्सने बातमी प्रसिद्ध केल्याने दुसऱ्या दिवशीच अधिकाऱ्यांनी धावती भेट देत तातडीने काम करण्याचे आदेश दिले होते.
आदेश होताच हेमंत रासने यांनी आम्ही आलो काम झाल ! सबका साथ सबका विकास असे बॅनर मागच्या आठवड्यात घोरपडे पेठ मोमीनपुरा सर्वत्र ठिकाणी लावले होते. काम संपण्यापूर्वीच पुन्हा बॅनर बाजी ची सुरुवात झाली आहे. ना खासदारांनी काम केलें ना नगरसेवकांनी काम केलं काम केलं आमदारांनी. असे बॅनर काही तासांपूर्वी लागल्याने नागरिकांनी यावर नाराजगी व्यक्त केली आहे.
नागरिक पुणे सिटी टाईम्सशी बोलताना सांगितले आम्हाला फक्त कामं हवीत. परंतु कामे न करता बॅनर बाजी करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम चालू आहे. अगोदर काम करा नंतर बॅनर बाजी? असे खडसावून नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी हेमंत रासणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आमचं काम बोलतं, काही दिवसांपासून मी स्वत पाठपुरावा करत होते. आणि त्यामुळेच हे काम आहे. लोकांनी फक्त बॅनर बाजीच करावी. काम मात्र काहीच होत नाही? नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. आता दादागिरी पर्यंत आलेत? दुसऱ्याने केलेल्या कामाच्या ठिकाणी बोर्ड लावायचे? तेही ठिक आहे परंतु लावलेले बोर्ड काढून आपले लावायचे.हि लोकशाहीला अनुसरून पद्धत नाही. माजे कार्यकर्ते पोलिसात तक्रार द्यायला गेलेले आहेत.असे रासणे म्हणाले आहे.
बॅनर काढल्यचा व्हिडिओ }}}👇 https://www.instagram.com/reel/C1mWDqxKTCo/?igsh=MXI5cmVpdjI0dzdvdQ==
पुणे शहराची नोंद ही भारताचा स्मार्ट सिटी मध्ये गणली जाते परंतु पुण्यातील मोमिनपुरा,गुरुवार पेठ आणि घोरपडे पेठ परिसरात अजून ही ड्रेनेज,रस्त्यावरील खड्डे,पिण्याचे पाणी आणि विजेची समस्या गंभीर होत चालली आहे. गेल्या वर्षीचा पवित्र रमजान महिना व ईद परिसरातील रहिवाशांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये साजरा केला एक वर्ष होऊन सुद्धा घोरपडे पेठ पोलीस चौकी ते मक्का मशिदी पर्यंत रस्त्यावर अजूनही खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.समाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी यांनी सांगितले आहे.