भारती विद्यापीठ पोलिसांनी केला भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त

0
Spread the love

१५० लिटर तुपाचा ( डालडा मिश्रित) माल जप्त.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

भेसळयुक्त तुप विकणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तपास पथकामचे पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा यांना नवले ब्रिज कडून कात्रजकडे जाणारे रोडचे कडेला, आयशर शोरुमचे बाजूला, आंबेगाव-बुद्रुक पुणे येथे एक इसम तुपाची भेसळ करुन नागरीकांना विक्री करत आहे अशी बातमी होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक,शिंदे यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन एफडीओचे मार्फतीने कारवाई आदेश दिले.

एका घरामध्ये मोहींदर सिंग, वय ३० वर्षे, हा तुपासारखा दिसणारा पदार्थ टिप व डब्या मध्ये भरत असताना दिसला, सर्व मिळून अंदाजे १५० लिटर सदरचा पदार्थ असून, नक्की काय आहे? याबाबत विचारले असता, त्याने भेसळयुक्त तुप ( डालडा मिश्रित) असल्याची माहीती सांगितली.

अन्न व औषध प्रसाधन अधिकारी के. व्ही. बारवकर यांनी येऊन सॅम्पल घेतले असुन,उर्वरीत साठा भेसळ असल्याचे संशयावरुन जप्त केले आहे. तसेच सॅम्पल हे राज्य आरोग्य प्रयोगशाळेला पाठविलेले असून, त्याचा अहवाल प्राप्त झालेनंतर पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.


सदरची कामगिरी सागर पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०२, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,संगिता यादव, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विजय पुराणिक,

पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here