पुणे महानगर पालिकेच्या परवानगी विना बिनधास्तपणे चालत आहे पान टपरी.
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी.
पुण्यातील भवानी पेठ जुना मोटार स्टॅन्ड येथील भाजी मार्केटचे गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हकीकत अशी की पुणे महानगर पालिकेने नागरिकांच्या सोईसाठी जुना मोटार स्टॅन्ड येथे भाजी मंडई चालू केली होती. परंतु त्या भाजी मार्केटचा वापर फक्त आणि फक्त दारू पिण्यासाठी व दारूडयांना झोपण्यासाठीच होत होता. याची दखल घेत “पुणे सिटी टाईम्सने” बातमी प्रसिद्ध केल्यानंतर झोपी गेलेली यंत्रणा खळबळून जागे होत मार्केटची दुसऱ्या दिवशीच साफसफाई करण्यात आली.
तर मंडई अधिकारी मुंद्ररूपकर यांनी सदरील भाजी मार्केटची पाहणी केली होती. परंतु पाहणी करून चालणार नाही तर थेट कारवाई व्हावी अशी मागणी होत राहिल्याने मंडई अधिकारी मुंद्ररूपकर यांनी दि.१४/२/२०२३ रोजी बंद असलेला गाळा त्वरित सुरु करणेबाबत गाळे धारकांना नोटीस बजावली होती. त्या नोटीसात पुणे म.न.पा. भवानी पेठ मार्केट, जुना मोटार स्टॅण्ड,येथील गाळे हे तुम्हाला मंडई विभागाकडून मासिक भाडे तत्वावर वाटप करण्यात आला होते. तुम्ही मासिक भाडे भरत आहात परंतु गाळ्यावर प्रत्यक्ष व्यवसाय करीत नसल्याचे, गाळा बंद असल्याचे व गाळ्यावर अस्वच्छता व गाळा इतर कारणासाठी वापरात असल्याचे मंडई विभागामार्फत केलेल्या पाहणीत वारंवार आढळून आले आहे.
याबावत आपल्याला यापूर्वी वारंवार कळविले आहे. परंतु अद्यापही आपणाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलेला नाही. सदर बाब गंभीर आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३७६,३७७, ३८६ व मार्केट बायलॉज’अन्वये दिलेल्या परवान्याचे शर्ती क्र. १८-२० चे भंग केला आहे.तरी, सदर मंडई मध्ये स्वतः व्यवसाय त्वरित २ दिवसात करावा. अन्यथा तुमचा गाळे पुणे म.न.पा.च्या ताब्यात घेण्यात येईल. त्यानंतर तुमच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.असे त्यात नमूद आहे.
परंतु नोटीस चिकटवून १४ दिवसांचा कालावधी झाला तरी गाळे ताब्यात घेण्यात आलेली नाहीत. गाळे तातडीने ताब्यात घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तर जबाबदारी नीट पार पाडली नाही व भाजी मंडई कडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मंडई अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे.