दोन अवैध धंदयावर कोंढवा पोलीस ठाणेकडुन मोठी कारवाई,

0
Spread the love

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतीत चोरुन चालणा-या अवैध धंदयावर कारवाईचा बडगा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप जवळ चालणा-या अवैध धंद्यावर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी,असरगरअली सय्यद,

दिपक जडे, अमोल हिरवे, महेश राठोड, जयदेव भोसले असे कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदयाचा शोध घेत असताना २ मार्च रोजी पेट्रोलिंग करत असताना शितल पेट्रोल पंप चौकात एक निळे रंगाची एम. एच. १२ एस.एफ.८२४५ टाटा ईन्ट्रा गाडीतील चालक बळीराम मारुती राऊत, वय ३५ वर्षे, रा. सरतापवाडी,महादेवनगर, उरुळी कांचन,

पुणे हा गाडीच्या मागिल बाजुकडील ताडपत्री बांधुन त्याच्या मधुन मोठया प्रमाणात चोरुन गावठी हाभट्टीची दारु विक्री करित असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. टेम्पो थांबुन त्याची पाहणी केली असता टेम्पोच्या मागे गाडीत पुठयाची खोक्याचे बंडल वरती ठेवुन त्याच्या खाली चोरुन ३९ हत्ती कॅन्ड मधुन १ लाख ९५ हजार १ हजार ३६५ लिटर दारु विक्री करता घेवुन चालल्याचे दिसले. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राऊत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पिसोळी भागात धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे, पत्र्याचे शेड तयार करुन त्याच्यामध्ये हातभट्टीची दारु तयार करणा-यासाठी लागणारी भांडी तयार केली जात असल्याची माहिती अंमलदार शरद नवले, इकबाल सय्यद, श्रीकांत शिरोळे, दिपक जडे यांना प्राप्त झाली होती.

त्याअनुषंगाने सदर ठिकाणी छापा कारवाई करुन सदर ठिकाणावरुन हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारी भांडी तयार करणारे १) किरण मनोज चव्हाण, वय २४ वर्षे रा.गोंधळेनगर हडपसर पुणे २) अनिल मशफरु वाघेला, वय २९ वर्षे, शेळपिपळगाव, ता.खेड, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्याच्याकडुन अॅल्युमिनीयमची ४९ हजार ,३०० रुपये किंमतीची भांडी जप्त करण्यात आली आहे.

दोन ठिकाणी अवैध धंदयावर मोठी कारवाई करुन सदर आरोपींविरुद्ध मुंबई प्रोव्हीबीशन अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार इक्बाल शेख कोंढवा पोलीस ठाणे हे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here