कोंढवा येथील जागा विकल्याचा प्रकार.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर ५५ मधील जागा वक्फ मालमत्ता असताना त्याचे प्लॉटींग करून विकण्याचा प्रकार घडला आहे. त्या संदर्भात स्वारगेट पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात भुराराम जेरुपराम प्रजापती वय ३६ वर्षे धंदा व्यवसाय रा. सर्व्हे नं. ४/३ गणपती मंदीरजवळ काकडे वस्ती कोंढवा बुद्रुक यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सन २०१८ मध्ये भुराराम व त्यांचा नातेवाईक थनमल प्रजापती असे दोघे व्यवसायाकरिता जागेच्या शोधात होतो. त्यावेळी त्यांना रोडवर लावलेली कोंढवा बुदुक येथील सर्वे नं. ५५/२५/४ येथील प्लॉटींगची जाहीरात दिसली. तेव्हा त्याविषयी अधिक माहीती घेउन ते जुन २०१८ मध्ये सदर जागेचे मालक वेदप्रकाश तनेजा यांना त्यांच्या प्लॉट नं. २०१ शामसुंदर को. ओप. सोसायटी सलीसबरी पार्क पुणे, येथील राहत्या घरी भेटले होते.
त्यावेळी वेदप्रकाश तनेजा यांची पत्नी सरोज तनेजा घरी हजर होत्या,
त्यावेळी वेदप्रकाश तनेजा व त्यांची पत्नी सरोज तनेजा यांनी सांगितले की, स.नं.५५/२५/४ या कोंढवा बुद्रुक येथील मिळकतीतील एकुण ६१ आर जमीन असुन त्यापैकी २० आर क्षेत्र हे वेदप्रकाश तनेजा यांचे नावावर असल्याचे व कादिर शेख, गणपत आडगळे याचे २०.५ आर असे असुन त्यांचे कुलमुखत्याधारक प्रस्तावित सरोज तनेजा व मुलगा माणिक तनेजा कडे आहे असे सांगितले.
तसेच त्यांनी सर्व मिळकत पुर्णपणे निर्वेध असल्याचे व ते १ व २ गुंठ्ठयाचे प्लॉट विकणार असल्याचे सांगितले, तरी तुम्ही काही काळजी करु नका तुम्ही बिनधास्त प्लॉट विकत घ्या असे दोघजन बोलले. त्यानंतर वेदप्रकाश तनेजा व सरोज तनेजा यांनी त्यांचे वकील सुभाष बोर्डे यांचा मोबाईल क्रमांक देउन त्यांना भेटण्यास सांगितले होते.
त्यानंतर भुराराम प्रजापती सुभाष बोर्डे यांना त्यांचे रास्ता पेठेतील ऑफिसमध्ये जाउन भेटले असता त्या वकिलांनी सांगितले की, सदरची प्रप्रर्टी निर्वेध असुन काही काळजी करु नका बिनधास्त घेउन टाका त्याबाबतची सर्व कागदपत्रे मी व्यवस्थित बनवुन देईल.
अशा प्रकारे वेदप्रकाश तनेजा व पत्नी सरोज तनेजा यांनी विश्वास दिल्याने त्याच्यावर विश्वास ठेवुन व्यवहार करण्याचे ठरले. एका गुंठ्ठया करिता रक्कम रु १४ लाख व नोंदणी शुल्क रु १६ हजार असा व्यवहार ठरला.
वेदप्रकाश तनेजा व सरोज तनेजा यांनी सांगितले की, व्यवहार ठरलेप्रमाणे तुम्ही मला लगेच जागेची रक्कम देउन टाका म्हणजे आपण पुढील खरेदीची कारवाई लवकर करुन घेउ.त्यांचेवर विश्वास बसल्याने बँक ऑफ बडोदा बँकेचा रु १० लाखांचा रक्कमेचा चेक व थनमल प्रजापती यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया बँकेचा ४ लाख रु चा चेक असे एकुण १४ लाखांचे चेक दिले.
तनेजा यांनी १० लाखांचा चेक वटवून घेतला होता. त्यानुसार ३० जून २०१८ रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग-२ हवेली क्र ९ यांचेकडे दस्त क्र ५६२४/२०१८ प्रमाणे नोंदविण्यात आला आहे. त्यावेळी वेदप्रकाश तनेजा व पत्नी सरोज तनेजा यांचेवर विश्वास ठेवुन फिर्यादी यांनी दस्तावर सहया केल्या.
त्यानंतर काही दिवसानंतर भुराराम प्रजापती व थनमूल प्रजापती ७/१२ उतारावर नाव नोंदविण्याकरिता कात्रज तलाठी कार्यालयात गेले असता तलाठी कार्यालयातून असे कळाले की, परिशिष्टात खरेदीखतातील स.नं.५५ च्या ऐवजी २०/४ असा उल्लेख असल्याने नमुद २०/४असा ७/१२ नाही म्हणुन सदर दस्त चुकलेला असुन त्यावर दस्ताची नोद घेता येणार नाही, तरी आपले दस्ताची नोंद घेता येणार नाही.
सदरचे ऐकुन दोघांना धक्काच बसला त्यावेळी फसवणुक झाल्याचे समजले. परत पैश्यांची मागणी केली असता तनेजा यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व घेतलेली रक्कम न दिल्याने व जी जागा अस्तित्वात नाही ती जागा विकल्याने तनेजांवर भारतीय दंड संहिता कलम ४०६,४२०,४६५, ४६८,४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.