सदरील ठिकाणी पोलीस व अग्निशमन जवान दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर येथील गल्ली नंबर ८ जवळ बिल्डिंगचा काम सुरू असताना स्लॅब कोसळला असून तीन मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहेत.
नगरवाला शाळे समोर ब्लु ग्रास कंस्ट्रकशन चे स्लॅब भरण्याचे काम रात्री सुरू होते.
स्लॅब भरताना तो अचानक कोसळल्याने स्लॅब खाली येऊन ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
सदरील घटनेच्या ठिकाणी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणखीन जख्मी व कोण मृत्यू झाला आहे का याचा शोध सुरू आहे.