पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी
पुणे शहरातील भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकाच्या पुतण्याकडून बुलेट चोरीचा प्रकार समोर आला आहे. अनिकेत अनंत कुमार घाटेराव वय २५ वर्ष, शालमली सोसायटी गोखले नगर यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून साहिल हरिश्चंद्र गौडा वय २६ वर्ष, नोकरी राहणार पर्वती दर्शन पुणे याला अटक करण्यात आली आहे.
अनिकेत हे कलाकार असून त्यांची रॉयल एनफिल्ड कंपनीची क्लासिक बुलेट एमएच २५ एटी २३९८ ही गाडी लक्ष्मी नारायण ठेटर च्या मागे पार्क केली होती. गाडी चोरी गेल्याची तक्रार पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांना तपास करत साहिल हरिश्चंद्र गौडा याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नं ८८/२०२४ भा. द. वि. कलम ३७९ नुसार दाखल केला आहे. अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.