पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
वयोवृध्द महिलेचे जबरीने ४ तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरटयाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे, कात्रज पुणे येथून
वयस्कर महिला या पायी जात असताना अनोळखी चोरटयाने त्यांच्या गळयातील २ लाख रुपये किमंतीचे ४ तोळे वजनाची सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारुन चोरुन नेलेवरुन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुरंन ७००/२२ भादवि कलम ३९२ प्रमाणें गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी गुन्हे शोध व तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेकामी सूचना दिल्या,
त्याप्रमाणे पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, आशिष गायकवाड व अभिनय चौधरी यांनी घटनास्थळ व आजू बाजूच्या परिसरातील सि.सी.टि.व्ही फुटेजची बारकाईने पहाणी करुन फोटो मिळवून त्यांना मिळालेल्या बातमीदाराच्या माहितीच्या आधारे शोध घेवून आरोपी विशाल कामराज कांबळे,वय ३० वर्षे,रा. पदमावती यास अटक करुन गुन्हयातील माल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी सागर पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, सुषमा चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग,श्रीहरी बहिरट वरिष्ठ
पोलीस निरीक्षक, विजय पुराणीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, व पोलीस
अंमलदार, नरेंद्र महांगरे, शैलेंद्र साठे, रविंद्र चिप्पा, मितेश चोरमले,
आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहूल तांबे,, धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, विक्रम सांवत, विश्वनाथ घोणे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.