कोंढव्यातील सराईत घरफोडी चोरास अटक; १ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Spread the love

५ गुन्हे दाखल असल्याचे आले समोर.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस कर्मचारी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग फिरत असताना बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की, एका इसमाकडे चोरीचे सोने असुन तो सोने विक्री करणेसाठी जाणार असुन तो सध्या राहते इमारतीचे समोर बसलेला आहे.

अशी खबर मिळाल्याने महिला पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावुन अमीर अजमाईन खान वय २० वर्षे रा.स. नं.१६, लिंमरा टॉवर, फ्लॅट नंबर २०२, तालाब मश्जिद जवळ, कोंढवा यास ताब्यात घेवून त्याचे कडे कसोशीने तपास केला.

त्याने कोंढवा परीसरात अनेक ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केल्याने खानकडून ५ घरफोडीचे गुन्हे उघड करुन एकुण १ लाख २ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी याचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहे.

१) कोढवा पोलीस ठाणे गु.र.नं.७०६‌ /२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८० २) कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. ७४५/ २०२२ भा. द. वि. कलम ४५४,३८० ३)कोंढवा पो.गु.र.नं. ६८२/२०२२ भा.द.वि.कलम ४५७, ३८० ४) कोंढवा पोलीस गु.र.नं. ७१४/२०२२ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० ५) कोंढवा पोलीस गु.र.नं. ६७६/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा
बाबर, महिला पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, रमेश साबळे, विलास खंदारे, आश्रुबा मोराळे, शहाजी काळे, दया शेगर यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here