पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे शहरातील शिवाजी नगर कोर्टातच थेट मोक्याच्या आरोपीला गांजा पुरविल्याचा प्रकार घडला आहे. मोककातील आरोपीला अटक करून शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या एका साथीदाराने गांजा दिल्याचा प्रकार पोलिसांच्या झाडाझडतीतुन समोर आला आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोक्कातील आरोपी मेहबूब जब्बार पठाण वय २५ रा. स्वारगेट, याच्यासह त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पठाण याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात मोक्काचा गुन्हा दाखल आहे.
त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता, साथीदाराने तेथेच गांजाची पुडी दिली.
पोलिसांनी पठाण ची झाडाझडती घेतल्यानंतर एक ग्राम गांजा सापडला. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.